शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

बिल थकवल्याने मनपाच्या शाळेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:12 IST

सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच नव्हे तर अन्य शाळांचादेखील वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी करण्यात आली आहे.

नाशिक : सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच नव्हे तर अन्य शाळांचादेखीलवीजपुरवठा खंडित करण्याची तयारी करण्यात आली आहे.  महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वीजपुरवठ्यासाठी देण्यात आलेला सहा ते सात लाख रुपयांचा निधी यापूर्वीच संपला असून, त्यामुळे मंडळाच्या अंदाजपत्रकातच अन्य तीन लेखाशीर्षाखाली असलेला निधी वीज देयकांसाठी वर्ग करावा यासाठी प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी तब्बल आठ पत्रे लेखा विभागाला दिली आहेत, परंतु लेखा विभागाने त्याची कोणतीही दखल न घेतल्याने ही नामुष्की महापालिकेवर आली आहे.  महापालिकेच्या १२८ प्राथमिक शाळा होत्या. त्यांचे एकत्रीकरण करून आता ९० शाळा करण्यात आल्या असल्या तरी जुन्या शाळांमधील वीज मीटरदेखील कायम आहेत.पाठपुरावा करूनही कार्यवाही नाहीमहापालिकेने शाळांमधील मुलांना सायकली देणे किंवा अन्य काही योजनांसाठी तरतूद केलेला निधी यावर्षी खर्ची पडणार नसल्याने हा निधी वीज देयकांसाठी वर्ग करून द्यावा, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सुमारे सात ते आठ वेळा पत्र दिले असल्याचे वृत्त आहे. परंतु लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे यांनी त्यावर कार्यवाही केलेली नाही. विद्यमान आयुक्तांनादेखील शिक्षण मंडळाचे सादरीकरण करताना याबाबत अवगत केल्याचे समजते. परंतु त्यानंतर अद्याप कार्यवाही न झाल्याने अखेरीस शाळांची वीज महावितरणने खंडित केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळाelectricityवीज