एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:32 IST2017-12-06T22:25:12+5:302017-12-06T22:32:12+5:30
नांदगाव : रेल्वे फाटकाजवळ बरेली एक्स्प्रेसमधून फेकले गेल्याने शशिकांत पद्माकर जोशी (४८) यांचा मृत्यू झाला. सदर गाडी बरेलीकडे जात होती. शशिकांत जोशी मलकापूर येथील रहिवासी होते.

एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठार
ठळक मुद्दे एक्स्प्रेसमधून पडल्याने इसम ठारखिशात आधार कार्ड सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली
नांदगाव : रेल्वे फाटकाजवळ बरेली एक्स्प्रेसमधून फेकले गेल्याने शशिकांत पद्माकर जोशी (४८) यांचा मृत्यू झाला. सदर गाडी बरेलीकडे जात होती. शशिकांत जोशी मलकापूर येथील रहिवासी होते.
धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती. त्यांना वाचविण्यासाठी तुषार पांडे व राम शिंदे यांनी घटनास्थळी
धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावली व शासकीय रुग्णालयात त्वरितदाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत
घोषित केले. खिशात आधार कार्ड सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस जगदाळे करीत आहेत.