मुळेगावात महिलांकडून दारुभट्टी उध्वस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 13:04 IST2019-12-28T13:04:10+5:302019-12-28T13:04:18+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुळेगाव येथे शनिवारी संतप्त महिलांनी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या.

 Due to drunkenness of women in village! | मुळेगावात महिलांकडून दारुभट्टी उध्वस्त !

मुळेगावात महिलांकडून दारुभट्टी उध्वस्त !

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुळेगाव येथे शनिवारी संतप्त महिलांनी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. मुळेगाव या गावात मोठ्या प्रमाणात दारु तयार केली जाते. याबाबत अनेकदा महिलांनी पोलिसांकडे तक्र ारी दाखल करु न देखील काहीच कारवाई होत नाही म्हणून या सर्व दारु च्या भट्ट्या वन विभागाच्या हद्दीत असुन वन वनविभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. याबाबत चौकशीची मागणी या महिलांनी केली आहे. विशेष म्हणजे रणरागिणी महिलांनी लगेच वाडीव-हे पोलीसांना कळविले आणि तात्काळ पो.हवा डी.आर मोरे यांनी त्या ठिकाणी जाऊन महिलांना मदत केली. उध्वस्त केलेले तिपडे, गॅलन, बादल्या आदी साहित्य जप्त केले. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. 

Web Title:  Due to drunkenness of women in village!

टॅग्स :Nashikनाशिक