शिवडे येथे आहाळात बुडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST2018-04-27T00:13:15+5:302018-04-27T00:13:15+5:30

सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Due to drowning in Shivdade, there is a death of child | शिवडे येथे आहाळात बुडून बालकाचा मृत्यू

शिवडे येथे आहाळात बुडून बालकाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवडे गावापासून जवळच बुवाजी बाबा मळा आहे. या मळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी आहाळ बांधण्यात आला आहे. सकाळी विद्युत जलपंपातून पाणी आहाळात पडत होते. स्वराज विजय गाडे हा सव्वा वर्षाचा बालक अंगणात खेळता खेळता आहाळाजवळ गेला. पाणी खेळता खेळता त्याचा तोल जाऊन तो आहाळात पडल्याचे सांगितले जात आहे. पाण्याची मोटार सुरू असल्याने त्याच्या नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शिवडे गावावर शोककळा पसरली.

Web Title: Due to drowning in Shivdade, there is a death of child

टॅग्स :Accidentअपघात