दहेगावची विद्यार्थिनी महिन्यापासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:50 IST2018-09-13T00:48:41+5:302018-09-13T00:50:01+5:30

नांदगाव : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती असल्यास ती कळविण्याचे आवाहन नांदगाव पोलिसांनी केले आहे.

Due to the disappearance of student from Dahegaon month | दहेगावची विद्यार्थिनी महिन्यापासून बेपत्ता

दहेगावची विद्यार्थिनी महिन्यापासून बेपत्ता

ठळक मुद्दे किशोर लहानू काकळीज याने पळवून नेल्याची फिर्याद

नांदगाव : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती असल्यास ती कळविण्याचे आवाहन नांदगाव पोलिसांनी केले आहे.
माहिती देणाºयाचा तपशील गुपित ठेवण्यात येऊन योग्य ते बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली. दहेगाव येथील ही सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी २७ जुलैला शाळेला जाते असे सांगून आपल्या भावासोबत घराबाहेर पडली. नांदगावच्या एका नामांकित शाळेत शिकणाºया या मुलीला भावाने शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सोडले व तो निघून गेला; मात्र शाळेतील प्रार्थना सुरू होण्यापूर्वीच एका मुलासोबत बाहेर पडली तेव्हापासून ती बेपत्ता आहे. या मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र त्यास अद्याप यश न आल्याने या मुलीला तांदुळवाडी येथील किशोर लहानू काकळीज याने पळवून नेल्याची फिर्याद नातेवाइकांनी पोलिसात दिली. आता त्या दृष्टीनेही तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Due to the disappearance of student from Dahegaon month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.