विलंबामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:20 IST2019-01-12T01:19:31+5:302019-01-12T01:20:17+5:30

इगतपुरी रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.

Due to the delay the train passengers | विलंबामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल

विलंबामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल

नाशिकरोड : इगतपुरी रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.
शुक्रवारपासून सोमवारपर्यंत पहाटे ३.४५ ते सकाळी १०.३० पर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-भुसावळ व भुसावळ-मुंबई पॅसेंजर तीन दिवस रद्द करण्यात आल्याने खांदेशमधील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. एलटीटी-गुवाहटी एक्स्प्रेस, सीएसएसटी-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, एलटीटी-फैजाबाद-राय बरेली या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Web Title: Due to the delay the train passengers