कोरोनामुळे यंदा येवल्याचा रंगोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:55 IST2021-03-31T23:16:59+5:302021-04-01T00:55:50+5:30
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहराचा वैशिष्ट्यपूर्ण व ऐतिहासिक रंगोत्सव रद्द करण्यात आला आहे.

कोरोनामुळे यंदा येवल्याचा रंगोत्सव रद्द
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहराचा वैशिष्ट्यपूर्ण व ऐतिहासिक रंगोत्सव रद्द करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. रंगोत्सवानिमित्ताने शहरात रंगणारे सामनेही रद्द करण्यात आले आहेत. बैठकीस रंगपंचमी समिती सदस्य उपस्थित होते. शहरवासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, माजी नगरसेवक संजय कुक्कर यांनी केले आहे.
तिथी प्रमाणे असलेली शिवजयंतीची मिरवणूक न काढता पहाटे शिवपुतळ्यास अभिषेक व पुष्पहार अर्पण करून समितीच्या वतीने सोशल डिस्टन्स पाळून अभिवादन करण्यात येईल, असेही संयोजकांनी स्पष्ट केले आहे.