स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

By Admin | Updated: August 6, 2014 00:45 IST2014-08-05T20:33:04+5:302014-08-06T00:45:23+5:30

स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

Due to the competition, the artwork of the students | स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

  मनमाड :सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना
वाव मिळत असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी केले.
मनमाड येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, संचालक गौतम संचेती, सुरेश शिंदे, अजय सोनवणे, कल्पेश बेदमुथा, प्रदीप गुजराथी, दगडू गुजराथी, प्रज्ञेश खांदाट हे व्यासपीठावर उपस्थित होते.
नितीन पांडे यांनी वाचनालयाच्या विविध उपक्र्रमांचा आढावा प्रास्ताविकातून घेतला. वक्तृत्व स्पर्धेत रुची वाले, निबंध स्पर्धेत अथर्व देशपांडे, धनश्री सोनवणे, तर कथाकथन स्पर्धेत सिद्धी देशपांडे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. मरेमा विद्यालयात स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गौतम संचेती यांनी वाचनालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कथाकथन तसेच नियोजित विषयावर बहारदार वक्तृत्व सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या अंतर्गत वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रकाश शेवाळे, सोनाली कुलकर्णी, गिरीश जोशी यांनी तर निबंध स्पर्धेसाठी विजय पाटील व प्रमोद मुळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन कल्पेश बेदमुथा यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Due to the competition, the artwork of the students