दुकाने बंद झाल्याने दुपारनंतर नाशकात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 01:48 AM2021-04-22T01:48:19+5:302021-04-22T01:48:54+5:30

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ७ ते ११ यावेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ११ वाजेनंतर दुकाने बंद झाल्याने दुपारनंतर शहरातील नाशिकरोड, पंचवटी, उपनगर, सातपूर, इंदिरानगर, सिडको, अंबड आदी भागांत शुकशुकाट पसरला होता. रस्त्यावर वाहनांची तुरळक ये-जा सुरू होती. केवळ औषधांची दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. 

Due to the closure of shops, there was a lull in Nashik in the afternoon | दुकाने बंद झाल्याने दुपारनंतर नाशकात शुकशुकाट

सकाळी ११ वाजेनंतर दुकाने बंद झाल्याने नाशिकरोडच्या मुक्तिधाम परिसरात पसरलेला शुकशुकाट.

Next
ठळक मुद्देगर्दीवर नियंत्रण : पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड परिसरात व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

नाशिक : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ७ ते ११ यावेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ११ वाजेनंतर दुकाने बंद झाल्याने दुपारनंतर शहरातील नाशिकरोड, पंचवटी, उपनगर, सातपूर, इंदिरानगर, सिडको, अंबड आदी भागांत शुकशुकाट पसरला होता. रस्त्यावर वाहनांची तुरळक ये-जा सुरू होती. केवळ औषधांची दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. 
नाशिकरोड भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाकडून औषधाची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना सकाळच्या वेळेतेच सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर बुधवारी दुपारपासून नाशिकरोड परिसरातील सर्व हमरस्ते निर्मनुष्य झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Web Title: Due to the closure of shops, there was a lull in Nashik in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.