भाऊबंदकीच्या वादातून हाणामारी, महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:23 IST2018-03-14T15:23:01+5:302018-03-14T15:23:01+5:30

नांदगाव- तालुक्यातील वडाळी बु येथील पवार कुटूबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसºया गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Due to the brother-in-law dispute, women were seriously injured | भाऊबंदकीच्या वादातून हाणामारी, महिला गंभीर जखमी

भाऊबंदकीच्या वादातून हाणामारी, महिला गंभीर जखमी

नांदगाव- तालुक्यातील वडाळी बु येथील पवार कुटूबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसºया गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुसºया गटाचे नागरिक नासिकच्या कामटवाडा व भगूर येथील रहिवासी आहेत. वडाळी बु येथे पवार कुटुंबातील दोन गटात शेतातील वापराच्या रस्त्यावरून झालेल्या मारामारीत लाकडी काठीचा वापर केल्याने तालुक्यातील वडाळी बु फिर्यादी अशोक माधव पवार यांच्या पत्नीच्या हाताचे हाड मोडून गंभीर जखमी झाली. त्यांनी फिर्यादीत सांगितले की, घरासमोर बैल खुट्याला बांधत आसतांना संशयित संजय माधव पवार, गुलाब माधव पवार, रा भगूर व समाधान माधव पवार, श्रेयस संजय पवार रा. कामठवाडा नाशिक यांनी वडाळी बु येथे येऊन तुम्ही आमच्या शेतातील रस्त्याचा वापर का करतात अशी कुरापत काढून पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करु न घरातुन बाहेर काढून काठीने व लाथांनी बुक्यांनी मारहाण करु न गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल. घटनेचा तपास नांदगांव पोलीस करीत आहे .

Web Title: Due to the brother-in-law dispute, women were seriously injured

टॅग्स :Nashikनाशिक