अधिकाऱ्यांअभावी ‘तहसील’मध्ये सामसूम
By Admin | Updated: September 1, 2015 22:39 IST2015-09-01T22:38:57+5:302015-09-01T22:39:42+5:30
अधिकाऱ्यांअभावी ‘तहसील’मध्ये सामसूम

अधिकाऱ्यांअभावी ‘तहसील’मध्ये सामसूम
मालेगाव : येथील महसूल विभागाच्या उपविभागीय व
तहसील कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी नसल्याने सामसूम होती. त्यामुळे अनेक प्र्रकारचे कामकाज ठप्प
होते. ग्रामीण भागातून कामासाठी आलेल्या गावकऱ्यांना सायंकाळी निराश होऊन परत जावे
लागले.
येथील प्रांत व तहसील कार्यालयातील मुख्य अधिकारी सोमवारी दिवसभर शासकीय कामाच्या आठवड्याचा पहिला दिवस असताना कार्यालयात हजर नसल्याने सामसूम आढळून आली. यातील प्रांत अधिकारी मुख्यालयी असल्याची माहिती मिळाली
आहे.
तहसीलदारांविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याविषयी माहिती देण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. त्यांच्याविषयी कोणालाही काही माहिती नसल्याची चर्चा रंगली होती. त्यांचे शासकीय वाहन दिवसभर कार्यालयाबाहेरील एका झाडाखाली उभे होते. अधिकारी कार्यालयात नसल्याने काही कर्मचारी गायब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
येथील प्रांत अधिकाऱ्यांना फेबु्रवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यापासून येथे नियमित अधिकारी नाही. त्याऐवजी चांदवड प्रांत अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे ते आठवड्यातून
एक किंवा दोन दिवस मालेगावी येतात. (प्रतिनिधी)