महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेमार्फत येथे सुसज्ज दुमजली कुटुंब कल्याण उपकेंद्र बांधण्यात आले आहे. या उपकेंद्राचे रंगरंगोटीसह जानेवारी महिन्यातच काम पूर्ण झाले आहे. १९ जानेवारीला उद्घाटन झालेले हे उपकेंद्र उभारण्यास शासनाला १ कोटी २० लाख रु पये खर्च आला. स्वागतकक्ष, तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, औषध विभाग, रु ग्ण उपचार कक्ष व डॉक्टरांसाठी दुसºया मजल्यावर स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उपकेंद्राच्या परिसरात पथदिप बसविण्यात आले आहेत, परंतु ते अद्याप बंद अवस्थेत आहेत. सदर कुटुंब कल्याण उपकेंद्रासाठी आजपर्यंत एकाही चौकीदार अथवा स्वच्छता कर्मचाºयाची नेमणूक केलेली नसल्यामुळे हे रु ग्णालय धुळ खात पडले आहे. सुसज्ज इमारत झाली, परंतु या इमारतीस पक्के कुंपण नसल्याने गावातील महिला व पुरु ष इमारतीच्या आडोशाचा फायदा घेत याच ठिकाणी लघुशंका करतात तर तळीराम रात्री अंधाराचा फायदा घेत याठिकाणी मद्यपान करतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने या सुसज्ज अशा इमारतीची दुर्दशा होत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत हे गाव असल्याने परिसरातील अनेक गावांचा या गावांशी संबंध येतो. दवाखाना सुरु झाल्यास परिसरातील महिलांच्या प्रसुतीची उत्तम सोय या ठिकाणी होईल. तसेच इतर आजारांवरही प्रथमोपचार या ठिकाणी केले जातील. त्यामुळे सामान्य रु ग्णांना दिलासा मिळेल. रु ग्णालय असूनही अधिकारी व कर्मचारी नसल्याने परिसरातील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी जावे लागते. अशा रु ग्णालयांचा खर्च सामान्य कुटुंबांना पेलवत नाही. त्यामुळे शासनाने दखल घेऊन या उपकेंद्रासाठी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करु न द्यावेत व रुग्णालयाची सेवा सुरु करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कुटूंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:03 IST