कसबे सुकेणे जैनस्थानकात चतुर्मासाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:17 IST2019-11-19T18:16:47+5:302019-11-19T18:17:06+5:30
कसबे सुकेणे येथील जैनस्थानकात पूज्य महाश्वेता मसा यांच्या उपस्थितीत चातुर्मास विविध धार्मिक कार्यक्र मांनी संपन्न झाला. समाजबांधवांच्या वतीने वर्धमान जैनस्थानकात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

कसबे सुकेणे येथील जैनस्थानकात चातुर्मास सांगतेप्रसंगी उपस्थित महाश्वेता मसा व नीता गांधी , योगिता गांधी, टीना कटारिया, मेघ गांधी, अक्षरा गांधी, पूर्व पोकरणा आदी.
कसबे सुकेणे : येथील जैनस्थानकात पूज्य महाश्वेता मसा यांच्या उपस्थितीत चातुर्मास विविध धार्मिक कार्यक्र मांनी संपन्न झाला. समाजबांधवांच्या वतीने वर्धमान जैनस्थानकात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. समारोपप्रसंगी पूज्य महाश्वेता मसा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी जाधव यांच्या वस्तीपर्यंत जैन समाजबांधव विहारात सहभागी झाले होते. त्यानंतरच्या विहारात आनंद कुंदन ग्रुप, कन्या मंडळ, नीता गांधी, योगीता गांधी, टीना कटारिया, मेघा गांधी, अक्षरा गांधी, पूर्व पोकरणा, आनंद बोगावात, नितीन गांधी, प्रीतेश पोकरणा, महामंत्री आनंद गांधी आदी जैन श्रावक सहभागी झाले होते.