प्रारंभी सरपंच रोहिदास कातोरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांनी कोरोना आजार आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी तसेच लवकरच राबविण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत उपस्थितांना माहिती दिली. प्रशिक्षित परिचारिकेकड़ून ड्राय रनचे मॉक ड्रिल करुन घेण्यात आले. लसीचे दुष्परिणाम दिसल्यास कशा प्रकारे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली गेली पाहिजे याबाबतही या ड्राय रनमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी,आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते.
वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीचे ड्राय रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 17:43 IST