पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:09 IST2020-07-24T21:44:04+5:302020-07-25T01:09:11+5:30

पेठ : तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील प्रमुख भात, नागली, वरई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व कृषी विभागकडून मार्गदर्शन व मोफत बी-बियाणे वाटप करण्यात यावे, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Dry drought should be declared in Peth taluka | पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा

पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा

पेठ : तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील प्रमुख भात, नागली, वरई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व कृषी विभागकडून मार्गदर्शन व मोफत बी-बियाणे वाटप करण्यात यावे, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष दामू राऊत, गिरीश गावित, विठोबा भोये, मनोहर चौधरी, मोहन गावंडे, जितेंद्र जाधव, नितीन भोये, हिरामण पवार, निवृत्ती सापटे, पुंडलिक सातपुते, नामदेव भोये,भास्कर भुसारे, अरुण भोये, तुकाराम सापटे, नितीन हलकंदर, संदीप पाडवी यांच्यासह राष्ट्रवादी व युवक कॉँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Web Title: Dry drought should be declared in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक