सुकेणे, जिव्हाळेला पीकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:23 IST2019-07-20T19:20:14+5:302019-07-20T19:23:07+5:30
कसबे-सुकेणे : शुक्र वारच्या मुसळधार पावसामुळे कसबे-सुकेणे व परीसराततील दात्याणे-जिव्हाळे येथे शेती पीकांचे नुकसान झाले. शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुकेणे परीसरात दमदार हजेरी लावली. जवळपास दिड तास पावसाचा जोर कायम होता.

सुकेणे, जिव्हाळेला पीकांचे नुकसान
कसबे-सुकेणे : शुक्र वारच्या मुसळधार पावसामुळे कसबे-सुकेणे व परीसराततील दात्याणे-जिव्हाळे येथे शेती पीकांचे नुकसान झाले.
शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुकेणे परीसरात दमदार हजेरी लावली. जवळपास दिड तास पावसाचा जोर कायम होता.
पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी राजा सुखावला असला तरी काही भागात नुकतीच लागवड केलेले टमाटा सारखे पिके भुईसपाट झाले आहे.
शनिवारी (दि.२०) दुपारपर्यंत द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जिव्हाळे येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात टमाटो, द्राक्षबागांचे बºयाच प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेने भगवान बोराडे, सुनिल पवार, किरण गवारे, शिवाजी गुरगुडे आदींनी केले आहे.