मेंढपाळाचा पाण्यात बुडून मृत्यू
By Admin | Updated: December 1, 2014 01:21 IST2014-12-01T01:20:59+5:302014-12-01T01:21:24+5:30
मेंढपाळाचा पाण्यात बुडून मृत्यू

मेंढपाळाचा पाण्यात बुडून मृत्यू
ओझरटाऊनशीप : मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी कोकणगाव शिवारातील कादवा नदीवर घेऊन गेलेल्या मेंढपाळाचा तोल जाऊन नदीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास लहानु केदू वानले (६५) राहणार कोकणगाव हे त्यांच्या मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी कादवा नदी पात्राच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. अचानक त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात पडले त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार, अे.पी.आय. आर. आर. बोडे, हवालदार विश्वास देशमुख, बी. डी. सादरे, क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेऊन वानले यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या संदर्भात ओझर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.