पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:35+5:302021-09-07T04:17:35+5:30

पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे बैलांसाठी लागणाऱ्या साजांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पितळी घागर ८०० ते ९०० रुपये ...

Drought at the hive festival | पोळा सणावर दुष्काळाचे सावट

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे बैलांसाठी लागणाऱ्या साजांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पितळी घागर ८०० ते ९०० रुपये किलो, पितळी तोडे ९०० रुपये किलो, रेशीमदोरी शंभर रुपये तर गोप मोहर की ५० ते १०० रुपयांपर्यंत, शेबी गोंडे १०० रुपये, माटुट जोड १५० रुपये याशिवाय बैलांचे शिंग रंगविण्यासाठी लागणाच्या हिंगुळ (ऑइल पेट ), गेरू इतर रंगांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

येथील व्यापारी गोविंद कासार यांनी सांगितले की, पूर्वी मुखेडसारख्या मोठ्या गावात चार-पाच व्यापारी दुकान लावायचे. यावेळी फक्त एकच दुकान होते. आपण मागविलेल्या मालापैकी निम्माही माल खपला नाही. वाढती महागाई आणि दुष्काळाच्या तडाख्याने बळीराजाचे अर्थजीवन कोलमडून गेले आहे. एरवी आपल्या लाडक्या सर्जा राजासाठी खर्च करताना बळीराजा सैल हात सोडतो असेही कासार यांनी सांगितले.

Web Title: Drought at the hive festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.