चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:22 IST2020-02-24T23:38:10+5:302020-02-25T00:22:27+5:30
देवळा : मेशी येथील बस दुर्घटना ताजी असतानाच देवळा येथे बसचे चाक अचानक निखळ असतानाच चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच ...

चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
देवळा : मेशी येथील बस दुर्घटना ताजी असतानाच देवळा येथे बसचे चाक अचानक निखळ असतानाच चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह ६५ ते ७० प्रवासी होते. यामुळे बिघाड झालेल्या बसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिवहन विभागाने मेशी दुर्घटनेपासून कोणताही बोध घेतल्याचे दिसत नाही.
सोमवारी (दि. २४) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सटाणा आगाराची देवळा कापराई वाखारी ही चक्री बस (एमएच २० डी ९३४१) वाखारी येथून देवळ्याकडे येत होती. देवळा येथील कोलथी नदीवरील पुलावर असलेल्या भाजीमंडईसमोर अचानक बसचे मागील चाक निखळून बाहेर येऊ लागले. चालक व्ही.बी. आहेर यांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित बस रस्त्यालगत उभी केली. अन्यथा चाक पूर्णपणे निखळले असते.परिणामी मोठा अनर्थ घडला असता. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये देवळा येथे महाविद्यालयीन व शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह ६५ ते ७० प्रवासी बसमध्ये होते. वाहतूक नियंत्रक व्ही. एन. गोसावी, बसचालक पांडुरंग पवार व प्रवाशांनी चालक आहेर यांचे अभिनंदन केले आहे. ही घटना विंचूर - प्रकाशा या महामार्गावर घडली. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीने दिली. घटनेनंतर सटाणा आगाराने त्वरित दुसरी बस पाठवून चक्र ी बससेवा पूर्ववत केली.
देवळा ते वाखारी या ६ किमी अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांच्या मनमानीला व बेजबाबदार वृत्तीला कंटाळून वाखारीच्या ग्रामस्थांनी खासगी प्रवासी वाहतुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद केली. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन १२ वर्षांपूर्वी वाखारी गावासाठी देवळा ते वाखारी ही चक्र ी बस सुरू केली होती. या नियमित बससेवेमुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. दिवसभरात या बसच्या २२ फेºया होतात.
- विलास सिरसाठ, ग्रामस्थ, वाखारी