ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST2021-05-22T04:15:11+5:302021-05-22T04:15:11+5:30

येवला - कोपरगाव महामार्गावर पिंपळगाव जलाल शिवारात मालट्रक क्रमांक (एमपी ०९ एचएच ३८९२) हा भरधाव वेगात कोपरगावच्या दिशेने जात ...

The driver of the truck overturned and died | ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

येवला - कोपरगाव महामार्गावर पिंपळगाव जलाल शिवारात मालट्रक क्रमांक (एमपी ०९ एचएच ३८९२) हा भरधाव वेगात कोपरगावच्या दिशेने जात असताना समोरील वाहनाने गतिरोधकावर अचानक ब्रेक दाबल्याने मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि शेजारील रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी झाला. यात ट्रक चालक कुरवंद महेश बहाल, जितेंद्र भोगिराम बहाल आणि नीरज अत्तर बहाल (रा. बडगाव, जिल्हा ग्वालियर, मध्य प्रदेश) हे तिघे ट्रकखाली अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई माणिक टिळे आणि सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांना बाहेर काढले. या वेळी उपचारासाठी नेत असताना ट्रक चालक कुरवंद बहाल यांचा मृत्यू झाला तर इतर दोघा जखमींवर उपचार करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The driver of the truck overturned and died