चालकाला आली चक्कर; बस गेली खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 23:37 IST2021-07-26T23:36:21+5:302021-07-26T23:37:12+5:30
मालेगाव : बसचालकाला चक्कर आल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर प्रवाशांना वाचविण्यात चक्कर आलेल्या बसचालकाला यश आले आहे. असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यात चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या बोधे फाटा येथे घडला असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात बस घुसल्याने दोन जण जखमी झाले.

मालेगाव - चाळीसगाव रस्त्यावर बोधे फाटा येथे खड्ड्यात रूतलेली बस.
मालेगाव : बसचालकाला चक्कर आल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर प्रवाशांना वाचविण्यात चक्कर आलेल्या बसचालकाला यश आले आहे. असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यात चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या बोधे फाटा येथे घडला असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात बस घुसल्याने दोन जण जखमी झाले.
मालेगावहून सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चाळीसगावकडे निघालेल्या बसचे (एमएच ०७ सी ९२६१) चालक पोपट पवार यांना चक्कर आली. त्यांनी बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाटा येथे रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जावून बस रूतली. यात जखमी झालेल्या दोन प्रवाशांसह बसचालक पोपट पवार यांना रुग्णवाहिकेचे राहुल पाटील, ज्ञानेश्वर पगार व बंटी शिंदे यांनी सामान्य रुग्णालयात नेले. प्रवाशांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.