शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव जलालला ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:07 IST

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात गुरुवारी (दि. २०) ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. 

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात गुरुवारी (दि. २०) ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. येवला - कोपरगाव महामार्गावर पिंपळगाव जलाल शिवारात मालट्रक क्रमांक (एमपी ०९ एचएच ३८९२) हा भरधाव वेगात कोपरगावच्या दिशेने जात असताना समोरील वाहनाने गतिरोधकावर अचानक ब्रेक दाबल्याने मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि शेजारील रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी झाला. यात ट्रक चालक कुरवंद महेश बहाल, जितेंद्र भोगिराम बहाल आणि नीरज अत्तर बहाल (रा. बडगाव, जिल्हा ग्वालियर, मध्य प्रदेश) हे तिघे ट्रकखाली अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई माणिक टिळे आणि सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांना बाहेर काढले. या वेळी उपचारासाठी नेत असताना ट्रक चालक कुरवंद बहाल यांचा मृत्यू झाला तर इतर दोघा जखमींवर उपचार करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू