गंगापूररोडवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:30 IST2018-05-28T00:30:53+5:302018-05-28T00:30:53+5:30
गंगापूररोडवरील महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शौचालयांची कामे अनेक वर्षे होऊनही पूर्ण झालेली नसून, या परिसरातील महिलांना शौचालयाअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष करून या गंगापूररोड व कॉलेजरोडवर तीन आमदार व एक खासदार राहात असूनही महिलांसाठी वरवर मोठमोठ्या सभांमध्ये आपण किती काम करतो ते सांगायचे आणि प्रत्यक्षात मात्र किती काम करतात, हे अपूर्ण असलेल्या महिला शौचालयावरून दिसून येते.

गंगापूररोडवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची वानवा
गंगापूर : गंगापूररोडवरील महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शौचालयांची कामे अनेक वर्षे होऊनही पूर्ण झालेली नसून, या परिसरातील महिलांना शौचालयाअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष करून या गंगापूररोड व कॉलेजरोडवर तीन आमदार व एक खासदार राहात असूनही महिलांसाठी वरवर मोठमोठ्या सभांमध्ये आपण किती काम करतो ते सांगायचे आणि प्रत्यक्षात मात्र किती काम करतात, हे अपूर्ण असलेल्या महिला शौचालयावरून दिसून येते. नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांच्या मुखातून सरकारच्या कामाबद्दल लाखोली वाहिली जाते. यातीलच एक अशोकस्तंभ ते गंगापूरगावापर्यंत नागरिकांसाठी रस्त्यावर पिण्यासाठी पाणी व स्वच्छतागृहाची गरज असताना एकही काम पूर्ण झालेले दिसत नाही. थत्तेनगर बसस्टॉपजवळ स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू झाले, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तेही काम रखडले आहे. परिसरात नागरिकांची मूलभूत गरज पिण्यासाठी पाणी व स्वच्छतागृह असू नये म्हणजे विशेषच, असे नागरिकांनी सांगितले.