डॉ. सांगळे यांचे वैद्यकीय परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:18+5:302021-06-20T04:11:18+5:30

--------------- सिन्नरला ५३ वटवृक्षांचे वाटप सिन्नर : सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या ...

Dr. Sangale's success in medical examination | डॉ. सांगळे यांचे वैद्यकीय परीक्षेत यश

डॉ. सांगळे यांचे वैद्यकीय परीक्षेत यश

---------------

सिन्नरला ५३ वटवृक्षांचे वाटप

सिन्नर : सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त ५३ वटवृक्षांच्या रोपांचे वाटप तसेच कोरोनायोद्धा यांचा सन्मान करण्यात आला. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुटे आदींचा तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

----------------------

वैभव नेहे मर्चंट नेव्ही इंजिनीअरपदावर

सिन्नर : येथील वैभव सतीश नेहे यांची मर्चंट नेव्ही इंजिनीअर म्हणून युरोपातील डेन्मार्क देशातील टॉर्म या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नेव्ही इंजिनीअरपदावर निवड झाली. वैभव हा रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे यांचा मुलगा आहे. पुणे येथील तोलानी मेरीटाइम इन्स्टिट्यूट या कॉलेजमध्ये वैभव मर्चंट नेव्हीच्या मरीन इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याची टॉर्म शिपिंग कंपनीसाठी निवड झाली आहे.

Web Title: Dr. Sangale's success in medical examination