सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:04 IST2020-08-10T15:04:56+5:302020-08-10T15:04:56+5:30

सिन्नर: सिन्नर महाविद्यालयात प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dr. P. as Sinnar College Principal. V. Juicy | सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ

सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ

ठळक मुद्दे पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे समन्वयक अधिष्ठाता म्हणून काम केले


सिन्नर: सिन्नर महाविद्यालयात प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. पी. व्ही. रसाळ प्राचार्य म्हणून रुजू झाले असून त्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे यांनी स्वागत केले आहे. डॉ. रसाळ यापूर्वी निफाड, त्रंबकेश्वर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे समन्वयक अधिष्ठाता म्हणून काम केले असून मानसशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच भारतीय मराठी मानसशास्त्र परीषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, श्रीमती. शकुंतला गायकवाड व सर्व स्टाफ यांनी स्वागत केले.

फोटो ओळी- डॉ पी व्ही रसाळ
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

Web Title: Dr. P. as Sinnar College Principal. V. Juicy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.