नाशिक : येथून मोखाडा येथे कारने जात असताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,रा.कामटवाडे, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. यामध्ये खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अधिक वृत्त असे कारचे टायर फुटल्याने चालक शिंदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्यावरील पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळले. अपघातमध्ये शिंदे यांना गंभीर मार लागला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन शिंदे यांना मोटारीतून बाहेर काढले. सुदैवाने एका गर्भवतीला प्रसूतीसाठी त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी आली. त्यांना नागरिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर डॉक्टरांनी शिंदे यांच्यावर प्रथमोपचार केले. तसेच त्यांना याच रु ग्णवाहिकेतून नाशिकला नेले. जिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांनी शिंदे यांना तपासून मयत घोषित केले.या अपघातामध्ये खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजिव रोहित गावित व जतीन संख्ये हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिकचे डॉ. संजय शिंदे अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:36 IST