डॉ. हेमलता पाटील यांनी दीड महिन्यातच दिला शिंदेसेनेचा राजीनामा
By संजय पाठक | Updated: April 15, 2025 18:08 IST2025-04-15T18:08:15+5:302025-04-15T18:08:57+5:30
कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

डॉ. हेमलता पाटील यांनी दीड महिन्यातच दिला शिंदेसेनेचा राजीनामा
संजय पाठक, नाशिक- काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी विधानसभा निवडणूकीत उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा दिला आणि सुमारे दीड महिन्यांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता अचानक शिंदे सेनेचा राजीनामा दिला आहे. अर्थात, आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी जाहीर केलेले नाही.
डॉ. हेमलता पाटील यांनी समाजमाध्यमांवर व्हीडीओव्दारे ही माहिती आज दिली आहे. डॉ. पाटील या १९९६ पासून नाशिक महापालिकेच्या नगरसेविका असून त्यांनी विरोधी पक्ष नेतापदही भूषवले १९९९ मध्ये प्रतिकूल परीस्थितीती विधान सभा निवडणूक त्यांनी लढवली हेाती. त्यात चांगली मते मिळावली हेाती. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असताना ही जागा उध्दव सेनेला सोडण्यात आल्याने डॉ. पाटील यांनी राजीनामा दिला होता आणि आता दीड महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्ली एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला हेाता. मात्र, आता आपण पक्षाला न्याय देऊ शकत नाही किंवा काम करू शकत नसल्याने राजीनामा दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.