धन्वंतरी पुरस्काराने डाॅ. संजय पलोड सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:31+5:302021-07-21T04:11:31+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल ...

Dr. Dhanvantari Award. Sanjay Palod honored | धन्वंतरी पुरस्काराने डाॅ. संजय पलोड सन्मानित

धन्वंतरी पुरस्काराने डाॅ. संजय पलोड सन्मानित

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, कांदा निर्यातदार ओमप्रकाश राका, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. विजय केंगे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी नानासाहेब पाटील, डाॅ श्रीनिवास दायमा, राहुल वाघ, ओमप्रकाश राका, राजेंद्र पलोड, डाॅ. संजय पलोड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी असोसिएशनच्यावतीने डाॅ. रोहित शेळके, डाॅ. खुशाल जाधव, डाॅ. दत्तात्रय जगताप, डाॅ. अविनाश पाटील, डाॅ. किरण निकम, ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. सूर्यवंशी, डाॅ. न्याहारकर, यांना "कोरोना योद्धा " म्हणून मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन डाॅ. अमित धांडे व डाॅ. संगीता सुरशे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डाॅ. रोहिणी गांगुर्डे यांनी केले.

--------------------

धन्वंतरी पुरस्काराने डाॅ. संजय पलोड यांना सन्मानित करताना डाॅ. दहाड, नानासाहेब पाटील, राहुल वाघ, ओमप्रकाश राका आदी. (१९ लासलगाव १)

190721\463319nsk_3_19072021_13.jpg

१९ लासलगाव १

Web Title: Dr. Dhanvantari Award. Sanjay Palod honored