शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सिडकोत कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून  दांपत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:15 IST

सावकारांकडून घेतलेल्या कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून पत्नी-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि़ १५) दुपारी अंबडमधील केवल पार्क परिसरात घडली़ वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४, रा़ कमल रेसिडेन्सी, अष्टविनायकनगर, केवल पार्क, अंबड, मूळ रा़ भोरटेक, ता़ शिरपूर, जि़ धुळे) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे़

सिडको : सावकारांकडून घेतलेल्या कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून पत्नी-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि़ १५) दुपारी अंबडमधील केवल पार्क परिसरात घडली़ वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४, रा़ कमल रेसिडेन्सी, अष्टविनायकनगर, केवल पार्क, अंबड, मूळ रा़ भोरटेक, ता़ शिरपूर, जि़ धुळे) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून पाच सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अष्टविनायकनगरमधील कमल रेसिडेन्सीमध्ये वासुदेव जाधव व संगीता जाधव हे दांपत्य राहत होते़ लेबर कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करणाऱ्या वासुदेव जाधव यांनी व्यवसायासाठी संशयित अशोक केदू होळकर, सुनील पूरकर, राहुल जाधव, प्रवीणभाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी या पाचही सावकारांकडून तगादा सुरू असल्याने जाधव पती-पत्नी तणावात होते़ त्यातच काही दिवसांपूर्वीच वासुदेव जाधव यांचा अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले व घरातील आर्थिक स्थिती बिघडली़ मात्र, यानंतरही सावकारांकडून कर्जाची सातत्याने मागणी सुरूच होती़सावकारांकडून पैशांच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे कंटाळलेल्या जाधव दांपत्याने सकाळच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला़ या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे आतेभाऊ समाधान पवार यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अंबड पोलिसांना माहिती दिली. अंबड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत असताना त्यांना जाधव यांनी मृत्युपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळून आली़ त्यामध्ये या पाच सावकारांकडून घेतलेले कर्ज व त्यासाठीचा तगादा यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले होते़  अंबड पोलिसांनी या चिठ्ठीवरून संशयित सावकार अशोक केदू होळकर, सुनील पूरकर, राहुल जाधव, प्रवीणभाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़सिडकोसह टक्केवारीचा धंदा जोरातशहरात विविध ठिकाणी त्यात सिडको व अंबड परिसरात अवैध सावकारीला ऊत आला आहे़ महिना वीस ते पंचवीस रुपये दराने सावकार अडलेल्या व्यक्तीस कर्ज देतात़ या कर्जाची वसुली करण्यासाठी गुंड हाताशी धरले जातात. प्रसंगी मारहाण व घरातील सामान उचलून नेण्याचे प्रकार घडतात़ मात्र सावकाराच्या गुंडगिरीला घाबरून कर्जदार पोलिसांकडे जाण्यास तयार होत नाही़ तसेच कर्ज देण्यापूर्वीच सावकार कायदेशीर कागदोपत्री लिखापढी करून कर्जदारास पुरते अडकवून ठेवतात़खोट्या केसेसची धमकीजाधव दांपत्याने या पाच सावकारांकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये कर्ज घेतले असून, ते वेळोवेळी परत केले होते़ मात्र, तरीही त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी संशयितांकडून दिली जात होती़ सततच्या या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून तणावामुळे आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़

टॅग्स :Deathमृत्यूnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय