मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट

By Admin | Updated: May 13, 2015 00:54 IST2015-05-13T00:54:10+5:302015-05-13T00:54:38+5:30

मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट

Double crown for Mumbai suburb | मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट

मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट

  नाशिक : नाशिक जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनद्वारा आयोजित मिनी सॉफ्टबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या संघाने बाजी मारली. मुंबई उपनगरच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी स्पर्धेचे विजेतेपद संपादन करीत दुहेरी मुकुट पटकावला. नवी मुंबईच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी उपविजेतेपद पटकावत पुन्हा एकदा मुंबईचे वर्चस्व सिद्ध केले. जळगाव जिल्'ाच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी तृतीय स्थान पटकावीत उत्तर महाराष्ट्राची लाज राखली. तिसऱ्या दिवशी झालेल्या मुलांच्या पहिल्या उपान्त्य सामन्यामध्ये नवी मुुंबई संघाने जळगावचा ५-४ होम रनने, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने यजमान नाशिक संघाचा ८-५ होमरनच्या फरकाने पराभव करीत अंतिम सामन्यामध्ये धडक दिली. अटीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई उपनगरने बाजी मारली व पहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये यजमान नाशिक संघाला जळगाव संघाकडून पराभव पत्करावा लागला. मुलींचा अंतिम सामनासुद्धा मुंबई उपनगर विरुद्ध नवी मुंबई असा झाला. त्या सामन्यातसुद्धा मुंबई उपनगर संघाने नवी मुंबई संघाचा पराभव करीत आपल्या संघाला दुहेरी मुकुट प्राप्त करून दिला.

Web Title: Double crown for Mumbai suburb