शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’ थांबता थांबेना...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:31 IST2021-09-02T04:31:05+5:302021-09-02T04:31:05+5:30
----चौकट-- तडीपारांचा सर्रास मुक्त संचार--- तडीपार गुंड सर्रासपणे शहरात वावरत असूनही पोलिसांच्या ते नजरेस पडत नाही हे विशेष! सोनसाखळी ...

शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’ थांबता थांबेना...!
----चौकट--
तडीपारांचा सर्रास मुक्त संचार---
तडीपार गुंड सर्रासपणे शहरात वावरत असूनही पोलिसांच्या ते नजरेस पडत नाही हे विशेष!
सोनसाखळी चोर, दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याने गुन्हे शाखेच्या सर्वच युनिटच्या प्रमुखांना आपले ‘नेटवर्क’ अधिक सक्षम करत ‘कानोसा’ घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या बांधून नाशिककरांमध्ये ‘खाकी’विषयीचा असलेला विश्वास अधिकाधिक वृध्दिंगत करण्यासाठी ठोस प्रयत्न करावे लागणार हे निश्चित...!
---
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण सणासुदीचा काळ सुरू झाला असून आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दीपावलीसारखे सण-उत्सव येऊन ठेपले आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठादेखील पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. यामुळे पोलिसांपुढे गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
- अझहर शेख, नाशिक