बच्चू कडू समाजाच्या भानगडीत पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:27+5:302021-07-17T04:13:27+5:30
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी मुस्लीम युवकाशी लग्न करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, या लग्नाला कोणीही ...

बच्चू कडू समाजाच्या भानगडीत पडू नका
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी मुस्लीम युवकाशी लग्न करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, या लग्नाला कोणीही विरोध करणार नाही. आपण स्वतः लग्नाला येऊ, असे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. त्यामुळे नाराज झालेले घोडके यांनी, बच्चू कडू हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी समाजाच्या वैयक्तिक कामात लुडबुड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्याला न्याय द्यावा. लग्नाचा हा प्रश्न कुठल्याही प्रकारचा लव्ह जिहाद नाही. सदर कुटुंबाला विवाह मान्य असेल तर आमची हरकत नाही. परंतु त्या कुटुंबीयांना कुणी फूस लावत असेल आणि दबाव टाकत असेल तर त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करू. सदर प्रश्न हा नाशिकचा व घरगुती प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सज्ज आहेत, असेही घोडके यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.