शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

गरजू मुलांसाठी पुस्तकांचे दान ; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:01 PM

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांप्रमाणेच विचार आणि भावना व्यक्त करणे ही मानवी प्रवृत्ती असून, वाचनामुळेच सद्विचारांची प्रेरणा मिळून सद्भावना वाढीस लागते. यासाठी वाचनाची आवड असलेल्या अनेक गरजू लोकांपर्यंत तसेच अनाथालयातील मुलांपर्यंत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी ‘पुस्तके दान करा’ असा डोनेट युवर बुक्स डॉट इन संकेतस्थळाचा उपक्रम नाशिकमधील सॉफ्टवेअर अभियंता ओंकार गंधे आणि त्याच्या सहकारी मित्रांनी हाती घेतला असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांप्रमाणेच विचार आणि भावना व्यक्त करणे ही मानवी प्रवृत्ती असून, वाचनामुळेच सद्विचारांची प्रेरणा मिळून सद्भावना वाढीस लागते. यासाठी वाचनाची आवड असलेल्या अनेक गरजू लोकांपर्यंत तसेच अनाथालयातील मुलांपर्यंत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी ‘पुस्तके दान करा’ असा डोनेट युवर बुक्स डॉट इन संकेतस्थळाचा उपक्रम नाशिकमधील सॉफ्टवेअर अभियंता ओंकार गंधे आणि त्याच्या सहकारी मित्रांनी हाती घेतला असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  आपल्या घरातील जुनी होतात, मग ती कुणी वाचत नाही, अशी पुस्तके रद्दीत देण्याऐवजी वाचनाची आवड असलेल्या गरजू लोकांपर्यंत पोहचवावी, असे अनेकांना वाटते. या विचारातूनच ओंकार गंधे यांनी आपल्या मित्रांच्या सहकाऱ्याने ‘डोनेट युवर बुक्स डॉट इन’ ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून गरजूंना पुस्तके दान करता येतात. शाळा, कॉलेजमधील पुस्तकांचादेखील समावेश करता येतो. या वेबसाइटवर जाऊन फक्त माहिती भरायची आणि आपल्या पुस्तके दान करायची की मागायची याबाबत हे कळवावे लागते. त्यानुसार तुम्हाला पुस्तक दान करायचे असेल तर वेबसाइटवर माहिती भरल्यानंतर त्या पुस्तकांची मागणी केली असेल त्यांच्यापर्यंत ही पुस्तके पोहोचविली जातात. त्यामध्ये डोनेट युवर बुक्स डॉट इन हे एक मध्यस्थासारखे कार्य करते. या आवाहनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पुणे, नगर, संगमनेर अशा विविध शहरांमधून तसेच ग्रामीण भागांमधून विविध प्रकारची पुस्तके जमा झाली आहेत.  तसेच आदिवासी भागातील मुलांपर्यंत तसेच खेड्यापाड्यांतील ज्या मुलांना आणि सर्वसामान्य नागरिक महिला, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यामार्फत सदर पुस्तके पोहोचविण्यात येतात. त्याचप्रमाणे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजची पुस्तके विकत घेणे  परवडत नाही. त्यांनादेखील श्रीमंत विद्यार्थ्यांकडून मिळालेली पुस्तके पुरविण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत असल्याचे गंधे यांनी सांगितले.स्वखर्चातून उभारले फिरते ग्रंथालयअनेक वाचकांना पुस्तक वाचनाची आवड असते, परंतु ते पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत. अशा पुस्तक वाचकप्रेमींसाठी ओंकार गंधे यांनी दर महिन्याला आपल्या नोकरीतून विशिष्ट रक्कम खर्च करून पुस्तके खरेदी केली असून, ती गरजूंपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाचनासाठी पोहचविली जातात.

टॅग्स :Nashikनाशिक