धुमाकूळ घालणारी मादी बिबट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:38 IST2021-03-05T20:10:01+5:302021-03-06T00:38:58+5:30

सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागातील फुलेनगर(माळवाडी) येथे गेल्या महिन्यापासून धुमाकूळ घालणारी मादी बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.

Dominant female bib | धुमाकूळ घालणारी मादी बिबट जेरबंद

धुमाकूळ घालणारी मादी बिबट जेरबंद

ठळक मुद्दे फुलेनगर : पंधरा दिवसांपासून होता पिंजरा

गेल्या महिन्यापासून फुलेनगर परिसरात अनेक शेतकऱ्यांना दिवसा व रात्रीच्यावेळी बिबट्या दिसला होता. अनेक पाळीव कुत्र्यांना बिबट्याने भक्ष्य केले होते. अनेक शेतकऱ्यांना शेतात पाणी भरतांना बिबट्या दिसून आल्याने शेतकरी धास्तावले होते.
शेतकऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी वनविभागाने सुरेश त्र्यंबक भगत यांच्या शेतात पिंजरा लावला होता. शुक्रवारी (दि.५) पहाटे या पिंजऱ्यात मादी बिबट अडकली. पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या डरकाळ्यांनीच शेतकरी जागे झाले. पोलीस पाटील भगत यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती सिन्नरच्या वनविभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, ए बी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी प्रीतेश सोनवणे, वनरक्षक के. आर. इरकर, मधुकर शिंदे, ए. जे. पवार, वनसेवक नारायण वैद्य यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी फुलेनगर येथे धाव घेऊन पिंजऱ्यातील बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची रवानागी वनविभागाच्या हद्दीत केली.

Web Title: Dominant female bib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.