ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 08:13 PM2021-01-21T20:13:01+5:302021-01-22T00:38:19+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा जिंकत वर्चस्व निर्माण केले तर माजी उपसरपंच सुनील गिते यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.

Dominance of Gram Vikas Panel in Brahmanwade Gram Panchayat | ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

googlenewsNext

गोदा युनियन संस्थेचे संचालक कैलास गिते, माजी उपसरंपच खंडु गिते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेल तर सुनील गिते यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली होती.यात ग्रामविकास पॅनेलला मतदारांनी स्पष्ट बहुमत देत ग्रामपंचायतीची सत्ता दिली तर माजी उपसरपंच गिते यांना एकही जागा जिंकता आली नाही. ग्रामविकास पॅनेलकडून कैलास धोंडीराम गिते, विलास बाबुराव गिते, सुखदेव एकनाथ गिते, शांताराम रूंजा माळी, सुमन सुखदेव गिते, सुमन दत्तू गिते, चंद्रभागा कचेश्वर वाघ, शीतल पांडुरंग गिते व क्रांती सतीश रामराजे आदी सर्व नऊ सदस्य विजयी झाले आहेत.

Web Title: Dominance of Gram Vikas Panel in Brahmanwade Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.