कलानगरमध्ये घरफोडीत रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 23:53 IST2016-01-03T23:50:14+5:302016-01-03T23:53:32+5:30
कलानगरमध्ये घरफोडीत रोकड लंपास

कलानगरमध्ये घरफोडीत रोकड लंपास
नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे सुरू होऊन एक दिवस उलटत नाही तोच घरफोडीची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कलानगरमधील स्वामीराज बंगल्यातील रहिवासी महेश दत्तात्रय मोरे हे २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान बाहेरगावी गेले होते़ चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकरणी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
पंचवटीतून मनोरुग्ण बेपत्ता
पेठरोड परिसरात राहणारा २८ वर्षीय मनोरुग्ण गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता आहे. याबाबत त्याच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली आहे. हनुमंत शंकर निफाडे (२८) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव असून, तो दिनांक २६ डिसेंबरपासून पेठरोड, म्हसोबानगर येथून बेपत्ता झाला आहे. अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट, तपकिरी रंगाची पॅँट व उजव्या हातावर हनुमानाचे चित्र गोंदलेले असून वरील वर्णनाचा युवक कोणाला आढळून आल्यास पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी पत्रकान्वये केले आहे. (प्रतिनिधी)