बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:17 IST2020-02-29T00:16:19+5:302020-02-29T00:17:03+5:30

लॅमरोडवरील जमाल सॅनोटोरियममध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dogs killed in raid | बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार

बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार

देवळाली कॅम्प : लॅमरोडवरील जमाल सॅनोटोरियममध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळाली कॅम्पसह दारणा काठच्या क्षेत्रात बिबट्यांचे वास्तव्य सिद्ध झाले असून, या भागातील ऊसतोड झाल्याने बिबटे लपण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहेत. लॅमरोडवरील ओझरकर बंगला व बाजूला असलेल्या जमाल सॅनोटोरियममध्ये मागील काही दिवसांत बिबट्याने दर्शन दिल्याने वनविभागाने जमाल सॅनोटोरियममध्ये पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या त्यात अडकला नाही, त्यामुळे वनविभागाने तो पिंजरा दुसरीकडे हलविला.

Web Title: Dogs killed in raid