लोहशिंगवेत बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:42 IST2020-08-27T22:53:24+5:302020-08-28T00:42:01+5:30
लोहशिंगवे : येथील रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने सरपंच संतोष जुंद्रे यांच्या घराजवळचा पाळीव श्वनावर हल्ला करत ठार केले.

लोहशिंगवेत बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार
ठळक मुद्देबिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहशिंगवे : येथील रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने सरपंच संतोष जुंद्रे यांच्या घराजवळचा पाळीव श्वनावर हल्ला करत ठार केले. या घटनेमुळे गावात भीती निर्माण झाली आहे. या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता सरपंच संतोष जुंद्रे यांनी वनविभागाला कळवले असता वनविभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. यावेळी रामदास जुन्द्रै, आंबादास जुन्द्रै, रेल्वे कर्मचारी शिंदे रावसाहेब आदी उपस्थित होते.