श्वान आंदोलन युवासेनेला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST2021-03-18T04:15:13+5:302021-03-18T04:15:13+5:30

एन डी पटेल रोडवरील भाजपाच्या वसंत स्मृती या कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले होते. दिवसभर सोशल मीडियावर ...

The dog movement surrounded the youth wing | श्वान आंदोलन युवासेनेला भोवले

श्वान आंदोलन युवासेनेला भोवले

एन डी पटेल रोडवरील भाजपाच्या वसंत स्मृती या कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले होते. दिवसभर सोशल मीडियावर ‘श्वान आंदोलन’ चांगलेच चर्चेत राहिले होते. या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन संबंधितांकडून करण्यात आल्याचा आरोप करत भाजपाच्याही पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. युवा सेनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी भाजपाकडून करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दीपक दातीर, रूपेश पालकर, रमेश बर्वे, गणेश बर्वे, अमित बोरसे यांसह पाच ते सहा कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी ललित केदारे यांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: The dog movement surrounded the youth wing