दरेगावच्या कान्होबावर माहितीपट

By Admin | Updated: September 1, 2016 23:53 IST2016-09-01T23:45:38+5:302016-09-01T23:53:42+5:30

दरेगावच्या कान्होबावर माहितीपट

Documentary on Kanhoba Daregaon | दरेगावच्या कान्होबावर माहितीपट

दरेगावच्या कान्होबावर माहितीपट

 दरेगाव : नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी कानिफनाथ यांचे प्रसिद्ध स्थान असलेले चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील कान्होबा या नावाने नाशिक येथील रुद्रायोगी प्रोडेक्शन प्रस्तृत व
निर्माता बाळू शिवाजी लाड व दिग्दर्शक संतोष बोराटे यांनी या चित्रपटाचे नुकतेच प्रक्षेपण दरेगाव येथील कानिफनाथ मंदिरात
केले.
या माहितीपटाची निर्मिती बाळू लाड, दिग्दर्शन संतोष बोराटे, संगीत आर.के. ब्रॉन्स बॅण्ड, चलचित्र संतोष बोराटे, योगेश लाड यांनी केले आहे. तंत्रनिर्देशक अनिल निकम, कानिफनाथाची भूमिका रोहित सरवार, गोरक्षनाथाची गणेश वारे, मच्छिंद्रनाथ बंटी जवधरे, पुजारी ढवळे बाबा, डाळिंबाची स्रेहा शिरसाठ, चिंतामण देवधर यांची विम्लेश उपाध्याय शिष्याची भूमिका तानीया भागवत, योगेश लाड, प्रियंका सोनवणे, गीतांजली देवरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, चेतन माळी, करण सावळे, रविराज अथरे यांनी भूमिका केल्या आहेत. व्यवस्थापन शोभा लाड, मनीषा सोनवणे यांनी केले. नाशिक, शिर्डी, त्र्यंबकेश्वर येथील कलाकारांनी या माहितीपटात सहभाग नोंदविला. (वार्ताहर)

Web Title: Documentary on Kanhoba Daregaon