जनावरांची औषधे पडून, डॉक्टरांना नोटिसा

By Admin | Updated: May 7, 2014 22:15 IST2014-05-07T21:49:38+5:302014-05-07T22:15:00+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समितीसह मासिक बैठकीवर बहिष्कार टाकणारे पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

Doctors notice the medicines lying on the animals | जनावरांची औषधे पडून, डॉक्टरांना नोटिसा

जनावरांची औषधे पडून, डॉक्टरांना नोटिसा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समितीसह मासिक बैठकीवर बहिष्कार टाकणारे पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दिंडोरी पंचायत समितीच्या आवारात जनावरांची औषधे न उचलल्याने संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हा परिषदेची पशुसंवर्धन समितीची बैठक उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जिल्‘ातील पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी अनुपस्थित होते. समिती सदस्य नांदगावचे पंचायत समिती सभापती विलास अहेर यांनी नांदगाव तालुक्यात जनावरांना आवश्यक ती लस व औषधांचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली. त्यावेळी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी दिंडोरी पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या पशुसंवर्धन विभागाच्या गुदामातून जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी औषधे उचललेली नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)
औषधे उचलावीच लागतील
जिल्‘ातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मासिक बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजे, असे नाही. मात्र त्यांनी जनावरांसाठी आलेली औषधे व लस पुरवठा ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत जनावारांना वितरित केली पाहिजे. अन्यथा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिला आहे.

Web Title: Doctors notice the medicines lying on the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.