डॉक्टरांना प्रभागभूषण पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:14 IST2017-10-25T00:03:23+5:302017-10-25T00:14:44+5:30

रुग्णांसाठी वेळेची पर्वा न करता दिवस-रात्र सेवा देणाºया डॉक्टरांचा धोंगडेनगर मित्रमंडळाने केलेला सत्कार उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले.

The doctor will be given the Prabhbudhushan award | डॉक्टरांना प्रभागभूषण पुरस्कार प्रदान

डॉक्टरांना प्रभागभूषण पुरस्कार प्रदान

नाशिकरोड : रुग्णांसाठी वेळेची पर्वा न करता दिवस-रात्र सेवा देणाºया डॉक्टरांचा धोंगडेनगर मित्रमंडळाने केलेला सत्कार उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. दत्तमंदिररोड धोंगडेनगर येथे धोंगडेनगर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पारितोषिक वितरणप्रसंगी करंजकर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आॅल इंडिया कार डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष जे. एस. नोयल, राजू लवटे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, डी. जी. सूर्यवंशी, सुशील ललवाणी, महेश जोशी, सागर कर्पे, प्रिन्सी लांबा आदी उपस्थित होते.  यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवरात्रोत्सवात विविध स्पर्धेचे व रुग्ण सेवेसाठी दिवसरात्र काम करणाºया डॉ. आर. सी. कनोजिया, डॉ. तुषार देवरे, डॉ. रमेश पवार, डॉ. नंदकिशोर कातोरे, डॉ. समीर भिडे, डॉ. सौ. कुटे, डॉ. सतीश पापरीकर, डॉ.किरण कुमावत, डॉ. अजित जगताप, डॉ. चाकोते, डॉ. अमित मित्तल, डॉ. मोहन कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कोठावदे, डॉ. विजय कºहाडे यांना प्रभागभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन ठाकूर, शिवानी फासे यांनी काम बघितले. प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक नगरसेवक रमेश धोंगडे यांनी केले. यावेळी धोंगडेनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होते.

Web Title: The doctor will be given the Prabhbudhushan award