डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:36 IST2018-03-19T01:36:13+5:302018-03-19T01:36:13+5:30
नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला.

डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा
नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी चर्चासत्रात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, अॅड. एम. वाय. काळे, डॉ. एस. के. सिंगल, डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. मनोज चोपडा, डॉ. बी. एस. वी. प्रसाद, डॉ. कविता गाडेकर, नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सहभागी होत डॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन केले.
प्रारंभी सद्यस्थितीत डॉक्टर आणि रुग्णांना भेडसावणाºया समस्या मांडण्यात आल्या व त्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. डॉक्टरांनी आपल्याकडे येणाºया रुग्णांशी दिलासादायक संवाद साधल्यास गैरसमजला वाव उरत नाही. रुग्णांच्या प्रश्नांकडे संकुचित विचाराने न बघता व्यापकपणे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केल्यास डॉक्टर-रुग्ण नातेसंबंधातील विश्वासार्हता अधिक वाढते, असे मत गाडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. उपचारानंतर डिस्चार्ज देताना उद्भवणारे वाद आणि उपचार खर्चाविषयी रुग्णाच्या नातेवाइकांकडून घेतली जाणारी शंका, घडणाºया घटना रोखण्यासाठी रुग्णालयांकडून उपचार खर्चाची नियमित माहिती संबंधित नातेवाइकांना समुपदेशनाच्या माध्यमातून करून देणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. समाज घडविणे व बिघडविण्यासाठी कालसापेक्षता महत्त्वाची ठरते. सध्याचा काळ हा टोकदार झालेल्या भावनांचा झाला असून, अशा काळातून समाज वाटचाल करत असताना व्यवसाय जरी असला तरी वैद्यकीय क्षेत्राची नाळ सेवेसोबत जुळलेली आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांविषयी भावना व्यक्त करताना वैद्यकीय क्षेत्राकडून नकारात्मक विचारसरणीची आक्रमकता समाजाला मुळीच अपेक्षित नसते, असे परखड मत यावेळी अग्रवाल यांनी मांडले. याप्रसंगी डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. सतीश पाटील, डॉ. शेखर चिरमाडे, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. राहूल मोदगी यांच्यासह आयएमए सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, सचिव हेमंत सोननीस यांनी केले.‘नो सबस्टिट्यूड’ असे ठळक लिहाडॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाच्या आजारपणाचा योग्य पाठपुरावा करावा. रुग्ण जर दुसरे मत (सेकंड ओपीनियन) घेण्याचा प्रयत्न करत असेल तर डॉक्टरांनी कुठल्याही गैरसमज करून घेत स्वत:चा अपमान झाला वगैरे समजता कामा नये, तो त्याचा हक्क आहे. याउलट त्याला तशी गरज का वाटली याचा विचार करून अंतर्मुख होण्याची संधी रुग्णाने दिली, असे समजावे. प्रिस्क्रिप्शन लिहिताना केमिस्टला समजेल अशा भाषेत लिहावे आणि त्यावर ‘नो सबस्टिट्यूड’ असे ठळक अक्षरात नमूद करावे, असा सल्ला डॉ. एस. के. सिंगल यांनी त्यांच्या ‘वैद्यकीय शास्त्रशुद्ध पैलू अन् डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ विषयावर व्याख्यानात दिला.
...तर बिलाच्या रकमेसाठी दबाव गैर एखाद्या रुग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू होतो आणि अशावेळी रुग्णालयीन प्रशासन संंबंधित मयत रुग्णाच्या नातेवाइकांकडे बिलाच्या रकमेचा भरणा करण्याचा तगादा लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी वादविवादाच्या घटना उद्भवतात. रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचार खर्चाचे बिल त्यांच्या प्रमुख नातेवाइकाच्या हातात सुपूर्द करून आपले पुढील कर्तव्य रुग्णालयीन व्यवस्थापनाने पार पाडावे. बिलाची रक्कम अदा करण्याबाबतचा निर्णय नातेवाइकांवर सोडावा, असे डॉ. अमोल अन्नदाते यांनी त्यांच्या पहिल्या सत्रात झालेल्या व्याख्यानात सांगितले.