कुछ याद उन्हे भी कर लो..

By Admin | Updated: July 27, 2015 00:19 IST2015-07-27T00:19:37+5:302015-07-27T00:19:51+5:30

कारगिल विजय दिन : विद्यार्थ्यांची मानवंदना

Do remember them too. | कुछ याद उन्हे भी कर लो..

कुछ याद उन्हे भी कर लो..

नाशिक : भारत-पाकच्या कारगिल युद्धात ५७६ सैनिकांनी बलिदान देत कारगिल जिल्ह्याच्या लेह-लडाखच्या हिमशिखरांवर तिरंगा फ डकविला अन् २६ जुलै १९९९ रोजी ‘आॅपरेशन विजय’ पूर्ण झाले. या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी (दि.२६) भोसला सैनिकी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरात बॅण्डपथकाकडून वाजविण्यात येणाऱ्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ गीताच्या धूनवर संचलन करत शहिदांना मानवंदना दिली. दरम्यान, हुतात्मा स्मारकात शहीद जवानांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करत कारगिल विजयदिनाच्या भावना समर्थपणे व्यक्त केल्या.
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त भोसलाच्या प्रवेशद्वारावरून सैनिकी पोषाख असलेल्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संचलनाला सुरुवात करण्यात आली. अग्रभागी बारा घोडेस्वारांचे पथक संपूर्ण संचलनाचे नेतृत्व करत मार्गस्थ होते होते. त्यांच्या मागे विद्यार्थ्यांचे लष्करी बॅण्डपथक ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या देशभक्तीपर गीताची धून वाजवित होते. या लक्षवेधी धूनच्या तालावर अन्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पथकाने समर्थनगर, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, जुने सीबीएसमार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत संचलन केले.

Web Title: Do remember them too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.