घर व फ्लॅट खाली करत नाही, माय-लेकीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST2018-05-14T00:20:26+5:302018-05-14T00:20:26+5:30
घर व फ्लॅट खाली करत नाही, या कारणावरून माय-लेकीचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित प्रवीण मधुकर खर्डे (रा़ पंचवटी) विरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

घर व फ्लॅट खाली करत नाही, माय-लेकीला मारहाण
नाशिक : घर व फ्लॅट खाली करत नाही, या कारणावरून माय-लेकीचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित प्रवीण मधुकर खर्डे (रा़ पंचवटी) विरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजीनगरमधील मोहिनी बंगल्यात पीडित महिला तिच्या मुलीसह राहते़ दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित प्रवीण खर्डे हा बळजबरीने घरात घुसला व महिलेसह तिच्या मुलीस अश्लील भाषेत शिवीगाळ केली़ यानंतर पीडित महिलेचे केस पकडून विनयभंग केला़ संबंधित महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ही केवळ झलक आहे, घर आणि फ्लॅट खाली केला नाही तर कापून टाकेल, अशी धमकीही दिली़ दरम्यान, संशयिताने केलेल्या मारहाणीत पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे़