मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाही : यूजीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:42 IST2018-08-15T00:41:05+5:302018-08-15T00:42:36+5:30

यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या १७ अभ्यासक्रमांना केंद्रीय अनुदान आयोगाने नकार दिल्यानंतर आता मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केले नसल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे. यावरून ‘यूजीसी’ने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 Do not cancel any course of Open University: UGC | मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाही : यूजीसी

मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाही : यूजीसी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या १७ अभ्यासक्रमांना केंद्रीय अनुदान आयोगाने नकार दिल्यानंतर आता मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केले नसल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे. यावरून ‘यूजीसी’ने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.  देशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रम प्रस्ताव छाननीत ज्या अभ्यासक्रमात त्रुटी आढळून येतील, त्या भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार असल्याचे यूजीसीने म्हटले आहे.  यूजीसीने हे पत्र मुक्त विद्यापीठांना पाठविले असून, ते मुक्त विद्यापीठालाही मिळाले आहे. इतर अभ्यासक्रम व अनुषंगिक माहिती १६ आॅगस्टला आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरही अभ्यासक्रमांबाबत काही शंका असल्यास आयोगाकडे दाद मागता येणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

Web Title:  Do not cancel any course of Open University: UGC