डिक्सळवासीयांना मिळाले नवीन रोहित्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:12+5:302021-07-26T04:13:12+5:30
पेठ : तालुक्यातील डिक्सळ येथे शनिवार (दि. २४) जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नवीन रोहित्राचे ...

डिक्सळवासीयांना मिळाले नवीन रोहित्र !
पेठ : तालुक्यातील डिक्सळ येथे शनिवार (दि. २४) जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नवीन रोहित्राचे उद्घाटन करण्यात आले. गावात नवीन विजेची लाइन टाकण्यात आली. गावात वीज सुरू होताच सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, गोपाळ धूम, तहसीलदार संदीप भोसले, भाऊ गावंडे, गिरीश गावित, जितेंद्र जाधव, सोमनाथ हिंडे, रघुनाथ पवार, तलाठी प्रियंका चौधरी, हेमराज भुसारे, पोलीसपाटील शंकर तुंगार, एकनाथ वॉर्डे, रामभाऊ महाले, कैलास राऊत , हेमराज जाधव, पुंडलिक सातपुते, गिरीधर खांबाईत, भाऊराव सातपुते यांच्यासह वीज वितरण कंपनी, वनविभागाचे कर्मचारी, परिसरातील सरपंच, पोलीसपाटील, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते. पोलीसपाटील शंकर तुंगार यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो - २५ पेठ डिक्सळ
पेठ तालुक्यातील डिक्सळ येथे नवीन रोहित्र शुभारंभप्रसंगी नरहरी झिरवाळ, भास्कर भगरे, गोपाळ धूम, संदीप भोसले आदी.
250721\25nsk_22_25072021_13.jpg
पेठ तालुक्यातील डिक्सळ येथे नवीन रोहीत्र शुभारंभ प्रसंगी नरहरी झिरवाळ, भास्कर भगरे, गोपाळ धूम, संदिप भोसले आदी.