सेवानिवृत्त सैनिकांच्या सत्काराने पुरणगावला दीपावली पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:37 IST2020-11-16T00:37:20+5:302020-11-16T00:37:41+5:30
येवला तालुक्यातील पुरणगाव येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधत गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. स्ट्रे कँटल ग्रुप व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाडवा पहाट कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

येवला तालुक्यातील पुरणगाव येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधत सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करताना संजय बनकर. समवेत मकरंद सोनवणे, प्रवीण गायकवाड, गणेश निंबाळकर, हरिभाऊ महाजन आदी.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधत गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. स्ट्रे कँटल ग्रुप व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाडवा पहाट कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार राजपूत, प्रहारचे उपजिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रहार येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, डॉ. सुरेश कांबळे, अमोल फरताळे, सुनील गायकवाड, भाऊसाहेब ठोंबरे, मच्छिंद्र ठोंबरे, उपस्थित होते.
यावेळी पुरणगावचे भूमिपुत्र राजेंद्र मधुकर ठोंबरे व जळगाव नेऊरचे सचिन कदम हे १८ वर्षांची देशसेवा करून सैन्यदलातून निवृत्त झाले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विकास अण्णासाहेब चरमळ यांची नाबार्ड बँकेच्या सहायक व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल, शिवा ठोंबरे यांनी कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल व कार्तिक विनोद ठोंबरे याने दहावीत (सीबीएसई) परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ता. येवला येथील सेवानिवृत्त सैनिकांचा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सत्कार करण्याची परंपरा जोपासत गावकऱ्यांनी तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पुरणगावचे भूमिपुत्र राजेंद्र मधुकर ठोंबरे व जळगाव नेऊरचे सचिन कदम हे १८ वर्षाची देशसेवा करून सेवानिवृत्त झाले तसेच विकास अण्णासाहेब चरमळ यांची नाबार्ड बँकेच्या सहायक व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल, शिवा ठोंबरे यांनी कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल व कार्तिक विनोद ठोंबरे याने दहावीत (सीबीएसई) परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी किशोर ठोंबरे, नागेश गाढे, किरण चरमळ, वाल्मीक ठोंबरे, रवि ठोंबरे, गणेश ठोंबरे ,सतीश ठोंबरे ,रावसाहेब ठोंबरे, मनीष ठोंबरे, संतोष ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे , रामदास ठोंबरे, निरंजन ठोंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालक किशोर ठोंबरे व नागेश गाडे यांनी केले.