दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:35 IST2019-04-06T00:35:15+5:302019-04-06T00:35:55+5:30
मागणी : संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनऔंदाणे : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळून त्यांचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी ...

दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळावे
मागणी : संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनऔंदाणे : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळून त्यांचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी, प्राथमिक शिक्षक या कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग कर्मचाºयांना आदेश देण्यात येऊ नये, असे निर्देश आहेत तरीही निवडणूक कामाबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. हे आदेश रद्द करण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ललीत सोनवणे, सचिव प्रमोद लोखंडे आदी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग अपंग अधिकारी, कर्मचारी यांना लोकसभा निवडणुकीसाठी आदेश देण्यात आले आहेत. या कर्मचाºयांना आदेश देण्यात येऊ नयेत याबाबत निवडणूक आयोगाचे आदेश असूनही आदेश देण्यात आले आहेत. तरी निवडणुकीपूर्वी हे आदेश रद्द करण्यात यावे.
- दिगंबर घाडगे पाटील,
राज्याध्यक्ष, अपंग कर्मचारी संघटना