दिव्यांग कन्या बनली विक्र ी कर सहाय्यक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:13 PM2020-07-25T19:13:28+5:302020-07-25T23:49:02+5:30

दिंडोरी : तालुक्यातील पश्चिम पट्यातील कोचरगाव येथील अपंगत्वावर मात करत डी.एड. करु न शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिता गायकवाड हिनेशिक्षक भरती होत नसल्याने निराश न होता एम पी एस सी परिक्षेची तयारी करत आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत दुसºया प्रयत्नात यशाला गवसणी घातली.

Divyang Kanya became the Assistant Sales Tax Officer | दिव्यांग कन्या बनली विक्र ी कर सहाय्यक अधिकारी

दिव्यांग कन्या बनली विक्र ी कर सहाय्यक अधिकारी

Next
ठळक मुद्देचिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात केली. ....

दिंडोरी : तालुक्यातील पश्चिम पट्यातील कोचरगाव येथील अपंगत्वावर मात करत डी.एड. करु न शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिता गायकवाड हिनेशिक्षक भरती होत नसल्याने निराश न होता एम पी एस सी परिक्षेची तयारी करत आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत दुसºया प्रयत्नात यशाला गवसणी घातली.
सुनिता गायकवाड हया अपंग असून त्यांनी सर्वच घरातील व शेतातील कामे करून प्राथमिक शिक्षण कोचरगाव ता. दिंडोरी येथे घेतले. सुनिताचेआई-वडिल हे दाम्पत्य कोरडवाहू शेती करतात. या दाम्पत्यास चार मुले व दोन मुली असून एक मुलगा वस्तीशाळा शिक्षक झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी सुनिताही जन्मत:च अपंग आहे. मात्र ती लहानपणापासूनच जिद्दी व हूशार असल्यामूळे शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची. तिने प्राथमिक शिक्षण कोचरगाव जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा, तिल्होळी येथे केले. डि. एड.करून टीईटी च्या दोन्ही परिक्षा उत्तीर्ण असतांनाही शिक्षक भरती नसल्यामुळे सुनिताने एमपीएससीव्दारे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत पुणे (रांजणगाव) येथे स्पर्धा परिक्षांसाठी अ‍ॅडमिशन घेत दुसºयाच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. या तिच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक विवंचनेमुळे तीला शेतमजुरीही करावी लागली. मात्र चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात केली.
....
माझी मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिची नेहमी काळजी वाटायची. आम्ही अडाणी असतांनाही तिने मिळवलेल्या यशाने आम्ही भारावून गेलो असून मुलीने नाव कमावले यातच खुप आनंद असल्याचे सुनिताचे वडील पोपट गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Divyang Kanya became the Assistant Sales Tax Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.